राळेगणसिद्धीत, संत यादवबाबा मंदिरात ३० जानेवारीपासून आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हजारे यांनी जाहीर केले.
२०११ मध्ये दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनादरम्यान भाजपचे नेते संसदेत माझ्या समर्थनार्थ भाषणे ठोकत होते. मागण्या कशा योग्य आहेत, हे संसदेत पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वेळी केलेली भाषणे केवळ सत्ता मिळवण्यासाठी होती का, असा सवाल हजारे यांनी केला आहे. उपोषणाच्या वेळी या भाषणांची ध्वनिचित्रफीत (व्हिडीओ) प्रसारित केली जाणार असल्याचे हजारे यांनी सांगितले. हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळवले आहे.