गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 9 जण जागीच ठार

नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. धारवाड राष्ट्रीय महामार्गावर (Dharwad National Highway) मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.  या अपघातात 9 जण जागीच ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी काही प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने धारवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ही घटना घडली. दावणगिरीहुन काही पर्यटक हे गोव्याला मिनी बसने जात होते. पहाटे धारवाड महामार्गावर मिनीबस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात मिनी बसचा चुराडा झाला आहे. या अपघातात अपघातात 9 जण जागीच ठार झाले आहे. घटनास्थळावर मृत प्रवाशांचा एकच आक्रोश मन सुन्न करणारा होता.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *