वाढदिवसाला मायावतीचं जोरदार ‘कमबॅक’, यूपी-उत्तराखंडात स्वबळावर लढणार

आगामी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुका बहुजन समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं पक्षप्रमुख मायावती यांनी जाहीर केलंय. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांत बहुजन समाज पक्षाचा विजय निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.बहुजन समाज पक्ष प्रमुख मायावती यांनी आपल्या वाढदिवसालाच एक महत्त्वाची घोषणा केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत बसपा कुणाशीही आघाडी करणार नाही. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका बसपा स्वत:च्या बळावर लढवणार असल्याचं मायावतींनी जाहीर केलंय.

कोणत्याही पक्षाशी आघाडी केल्यानं त्याचं नुकसान बहुजन समाज पक्षालाच सहन करावं लागतं, असंही मायावतींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांत बहुजन समाज पक्षाचा विजय निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.उद्यापासून सुरू होणाऱ्या करोना लसीकरण मोहिमेचंही मायावतींनी स्वागत केलंय. सोबतच, सर्व नागरिकांसाठी करोना लस मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मायावतींनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केलीय. आपलं सरकार सत्तेत आलं तर उत्तर प्रदेशच्या प्रत्येक नागरिकाला मोफत करोना लस पुरवण्यात येईल, असं आश्वासनही मायावती यांनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *