संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटनंतर अमृता फडणवीसांचा सणसणीत पलटवार

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. या प्रकरणात ठाकरे सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपकडून करण्यात आला होता. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीदेखील या वादात उडी घेतली होती.यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘जिनके घर शीशेके बने होते है.. वो दुसरो पे पत्थर नही फेका करते’ असे ट्विट करून भाजपला इशारा दिला होता
या ट्विटला प्रत्युत्तर म्हणून अमृता फडणवीस यांच्याकडून आणखी एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये अमृता फडणवीस यांनीही संजय राऊत यांच्यावर सणसणीत पलटवार केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील शाब्दिक युद्ध आता आणखीनच भडकण्याची शक्यता आहे.

भाजप नेते नारायण राणे यांनीही मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत सुशांत सिंह मृत्यूप्रकरणावरून शिवसेनेला धारेवर धरले होते. तसेच अमृता फडणवीस यांच्यावर टीका करणारे युवासेनेतील नेते वरुण सरदेसाई यांनाही नारायण राणे यांनी समज दिली होती. तू  लहान आहेस, अन्यथा तुझे तोंड कसे बंद करायचे, हे आम्हाला चांगल्याप्रकारे ठाऊक असल्याचे सांगत नारायण राणेंनी मिसेस फडणवीसांची पाठराखण केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *